पाचगणीत घोडेसफारी करताना नवविवाहित पर्यटकांचा मृत्यू

पाचगणी, दि. 25 (प्रतिनधी) –
पाचगणी येथील टेबललॅण्ड वर घोडे सफारी करीत असतानाच मुंबई येथील नवविवाहित पर्यटकांचा घोड्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या निमित्ताने पर्यटकांच्या सुरक्षतेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. या घडलेल्या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मोहंमद नसीब करीम खान ( वय वर्ष 35) याचा दुर्दैवी मृत्यूची फिर्याद नवविवाहित पत्नी शबाना मोहंमद करीम खान हिच्यावर आली. तो आपल्या पत्नीसमावेत फिरण्याकरिता पाचगणीस आला होता. हे दांपत्य काल संध्याकाळी पाचच्या सुमारास फिरण्याकरिता टेबललॅण्ड वर गेले असता लतिफ याने घोडेस्वारी करण्याचा मोह झाला. त्याने घोडेसफारीसाठी घोडा घेतला. घोड्यावर स्वार झाला पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. थोड्याच वेळात घोडा ऊधळला आणि घोड्यावरील मोहंमद खान खाली पडला त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्याला तत्काळ नाकातोंडातून रक्त येऊ लागल. त्याच्या नवविवाहित पत्नीस सुद्धा काही सुचेनासे झाले काळाने घाला घालीत नवदाम्पत्याचा संसार फुलण्यागोदरच विस्कटला होता.
या घटनेनंतर पाचगणीत सर्वत्रच शांतता पसरली होती. त्याला प्रथम प्राथमिक उपचाराकरिता बेलएअर हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले परंतु प्रकृती बिकट असल्याने त्यांना अन्यत्र हलविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार नसीब यास वाई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. उपचारापूर्वीच नसीब ने प्राण सोडला होता. डॉक्‍टरांनी त्याला पाहताच मृत घोषित केले .
रात्री उशिरा त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता पाचगणी येथील प्राथिमक आरोग्य केंद्रात आणला गेला. त्यानंतर आज शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह मुंबई वरून आलेल्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पाचगणी पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास सपोनि तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भूतकर करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)