पागंरी वसतिगृहातील मुलांना खाऊ वाटप

राजगुरूनगर- रामनवमी निमित्ताने पागंरी (ता. खेड) येथील वनवासी वसतिगृहातील अनाथ मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. रामनवमीचे औचित्य साधून खेड तालुका भजापच्या महिलांनी देणगीचा खर्च टाळून पांगरी येथील वसतिगृहतील अनाथ मुलांना खाऊ वाटप केले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्षा क्रांती सोमवंशी, माजी तालुका अध्यक्षा सुप्रिया मुळुक, सरचिटणीस पल्लवी नाईक, तालुका उपाध्यक्षा मोहीनी राक्षे, राजगुरूनगर शहाराध्यक्षा अर्चना जगताप, अरुणा घुले, सुरेखा कड यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)