पाक सर्वोच्च न्यायालयाने 14 कोटी रुपये जामीन रक्कम परत करावी – मुशर्रफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – सर्वोच्च न्यायालयाने आपली 20 लाख डॉलर्स (14 कोटी रुपये) जामीन रक्कम परत करावी अशी मागणी पकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे. मुशर्रफ यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून ही मागणी केली आहे.

सन 2006 मध्ये बलुचिस्तानचे राष्ट्रवादी नेते आणि माजी मुख्यमंत्री नवाब अकबर खान बुग्ती लष्करी कारवाईत मारले गेले होते. त्यावेळी लष्कर प्रमुख आणि राष्ट्रपती असलेले परवेझ मुशर्रफ यांच्या आदेशावरूनच ही हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला होता. सन 2015 मध्ये मुशर्रफ यांच्यावरील आरोप निश्‍चित करण्यात आले, त्यावेळी जामीन बॉंडच्या स्वरूपात मुशर्रफ यांनी ही रक्कम जमा केली होती.

बुग्ती हत्येच्या आरोपातून नंतर एका वर्षाने मुशर्रफ यांना मुक्त करण्यात आले होते. आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यामुळे आपली जामीन रक्कम परत मिळावी अशी मुशर्रफ यांच्या याचिकेत मागणी करण्यात आलेली आहे.
याचिकेच्या सुनावणीसाठी न्यायमूर्ती मुशीर आलम यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्य खण्डपीठाची नियुक्ती करण्यात आली आहे. 12 सप्टेंबर पासून या याचिकेवर सुनावणी सुरू होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)