पाक तुरुंगातून मुक्त होताच आसिया बीबी रहस्यमय प्रकारे गायब 

लाहोर (पाकिस्तान) – ईशनिंदा प्रकरणात निर्दोष सोडण्यात आलेली असियाबीबी रहस्यमय प्रकारे गायब झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. ईशनिंदा प्रकरणात प्रथम दोषी ठरवण्यात आलेल्या असिया बीबी या ख्रिश्‍चन महिलेला मुलतानमधील तुरुंगात ठेवण्यात आले होते. निर्दोष ठरवण्यात आल्यानंतर तिला मुलतान तुरुंगातून मुक्‍त करून नेदर्लॅंडला पाठवण्यात येणार होते. त्यासाठी तिला रावळपिंडी येथील हवाई तळावर नेण्यात येणार होते. मात्र आसियाबीबी रहस्यमय रीतीने गायब झाली आहे. तिचा कोणत्याही प्रकारे ठावठिकाणा लागत नाही, याबाबतीत पंजाब प्रांतच्या सरकारी प्रवक्‍त्याने काहीही टिप्पणी करण्यास नकार दिला असल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे.

सन 2010 मध्ये शेजारणीशी झालेल्या भांडणात आसिया बीबीने ईशनिंदा केल्याचा आरोप ठेवण्यात येऊन तिला तुरुंगवास टाकण्यात आले होते. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचे तिचे सारे प्रयत्न विफल होऊन तिला 8 वर्षे तुरुंगात राहावे लागले होते. तिच्या जिवाला धोका असल्याचे तिच्या पतीने सांगितल्यानंतर इटलीने तिला मुक्‍त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. डोनॉल्ड ट्रम्प आणि ब्रिटन व कॅनडाच्या पंतप्रधानांनाही या बाबतीत हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली होती.
आसिया बीबीच्या वकिलानेही-सैफ -उल-मुल्कनेही जिवाच्या भीतीने पाकिस्तान सोडले आहे.

तो सध्या नेदर्लॅंड्‌समध्ये आहे. आपल्या अशिलाला-आसिया बीबीला तुरुंगातून्ब मुक्त करून विमानात बसवून दिले असल्याची माहिती आपल्याला दिली असल्याचे सैफ-उल-मुल्क यांना सांगण्यात आले आहे. मात्र हे विमान कोठे गेले याचा काहीही ठावठिकाणा नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)