पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयात दोन तृतीयपंथीयांची होणार नियुक्ती

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच दोन तृतीयपंथीय व्यक्तींची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती पाकिस्तानचे वरिष्ठ न्यायाधीश साकिब निसार यांनी दिली.

विशेष म्हणजे तृतीयपंथीयांच्या हक्कांशी संबंधित एका प्रकरणात साकिब निसार हे सुनावणी करत होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा आपल्या समाजामध्ये दृष्टिकोन वेगळा आहे. समाजात त्यांना मानाचे स्थान नसल्यामुळे या समाजातील लोकांना त्यांचे हक्क मिळवून देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
मुख्य न्यायाधीश म्हणाले की, न्यायालयात लवकरच तृतीयपंथीयांच्या मुलभूत हक्कांची सुनावणी केली जाणार आहे. याबरोबरच यासंदर्भात संबंधित नोटीस खैबर पख्तूनख्वा क्षेत्रात सरकार लवकरच जारी करणार आहे. तृतीयपंथी समाज हा खैबर पख्तूनख्वा या परिसरात अनेक संकटांचा सामना करत होता.

दरम्यान, न्यायालयाकडून तृतीयपंथीयांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पाकिस्तानच्या राष्ट्रीय डाटाबेस आणि पंजीकरण प्राधिकरणाचे अध्यक्ष उस्मान मोबिन न्यायालयात चालू असलेल्या या सुनावणीदरम्यान उपस्थित होते. मोबिन म्हणाले की सर्व तृतीयपंथीय लोकांना त्यांचे ओळखपत्र देण्यात येईल आणि त्यांच्यासाठी एक अभियान सुरू करण्यात येणार आहे.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार पाकिस्तान एक रुढीवादी देश असून समलैंगिकतेला या देशात अवैध मानले जाते. तरी देखील पाकिस्तानने इतर देशांच्या तुलनेत तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क मिळवून देणाऱ्या कायद्यांना मंजुरी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)