पाकिस्तान दिन समारोहात फुटीरवादी नेत्यांचा सहभाग नाही

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – पाकिस्तानी उच्चायोग नवी दिल्लीत 23 मार्च रोजी पाकिस्तान दिन साजरा करणार आहे. मात्र, यावर्षी पाकिस्तानी उच्चायोग साजरा करत असलेल्या पाकिस्तान दिनामध्ये जम्मू-काश्‍मीरमधील पाकिस्तानचे समर्थक आणि फुटीरवादी नेते सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मीरवायज उमर फारूख आणि फुटीरवादी नेते सईद अली शाह गिलानी हे दोघेही या पाकिस्तान दिन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. आपल्याऐवजी आपले प्रतिनिधी कार्यक्रमासाठी पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पीपल्स पॉलिटिकल पार्टीचे अध्यक्ष हिलाल अहमद वार आणि मुस्सलिक आदिल या कार्यक्रमात सहभागी होंणार आहेत. सईद अली शाह गिलानी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्याऐवजी प्रवक्‍ते गुलजार अहमद आणि मोहम्मद अशरफ सहराई जाणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)