पाकिस्तान जाणारे पाणी भारत अडवणार! 

रावी नदीवरील धरण उभारण्यास केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली – पंजाबमधील रावी नदीवर शाहपूरकांदी धरण बांधण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली. त्यामुळे सध्या जे पाणी रावी नदीमार्गे पाकिस्तानला वाहून जाते किंवा वाया जाते त्याचा वापर करणे भारताला शक्‍य होणार आहे. हा प्रकल्प 2022 मध्ये पूर्ण झाल्यानंतर जम्मू-काश्‍मीर आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या दोन राज्यांच्या सिंचन क्षमतेमध्ये मोठया प्रमाणात वाढ होईल.

या प्रकल्पाची योजना 17 वर्षांपूर्वीच आखण्यात आली होती. पण राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. 2018-19 ते 2022-23 या पाच वर्षाच्या काळात केंद्राकडून प्रकल्पातील सिंचनाचा जो भाग आहे त्यासाठी राज्याला 485 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल. भारत-पाकिस्तानमधील सिंधु पाणी वाटप करार लक्षात घेऊनच केंद्रीय मंत्रिमंडळाने या धरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

-Ads-

1960 मध्ये झालेल्या करारानुसार भारताला पूर्वेकडच्या रावी, बियास आणि सतलज या तीन नद्यांच्या पाण्याचा पूर्ण वापर करण्याचा अधिकार आहे. हे धरण बांधून पूर्ण झाल्यानंतर पंजाबची सिंचन क्षमता 5 हजार हेक्‍टरने, तर जम्मू-काश्‍मीरची सिंचन क्षमता 32,173 हेक्‍टरने वाढणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे पंजाबला 206 मेगावॅट ऊर्जा क्षमतेचा हायड्रोपावर प्रकल्प उभारता येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)