पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे  एहसान मणी अध्यक्ष

नवी दिल्ली- आयसीसीचे माजी अध्यक्ष एहसान मणी यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मणी यांना तीन वर्षांसाठी या पदावर नियुक्‍त करण्यात आले असून मंगळवारी (4 सप्टेंबर) याबाबतची अधिकृत माहिती पीसीबीच्या ट्‌विटर हॅण्डलवरून देण्यात आली आहे. एहसान मणी यांनी निवड झाल्यानंतर लगेचच पदभार स्वीकारला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संचालक मंडळाने ही निवड केली आहे. आतापर्यंत या पदावर नजम सेठी विराजमान होते. त्यांनी 21 ऑगस्टला आपला पदभार सोडला. राजीनामा देताना त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुढील वाटचालीसाठी आणि पाकिस्तान क्रिकेट संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. पेशाने लेखापरीक्षक (सीए) असलेल्या मणी यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना या पदी नियुक्‍त करण्यात आले आहे.

एहसान मणी यांनी 1989 ते 1996 या काळात “आयसीसी’मध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2003 मध्ये त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मणी यांच्यासमोर अनेक आव्हाने असून पाकिस्तानमधील क्रिकेटच्या वाढीसाठी त्यांना वेगाने पावले उचलावी लागणार आहेत. ज्यात पाकिस्तान सुपर लीगपुढे असलेल्या अनेक आव्हानांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)