पाकिस्तान आणि चीन सीमांवर भारताच्या 400 आधुनिक तोफा

नवी दिल्ली – चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर भारत लवकरच 400 आधुनिक तोफा तैनात करणार आहे. सर्व ऋतुंमध्ये आणि अत्यंत उंच प्रदेशांपासून ते वाळवंटी प्रदेश आणि बर्फाळ प्रदेशातही परिणामकारक असणाऱ्या सर्व तोफा मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत तयार होणार आहेत. यापैकी 145 तोफा त्वरित मिळण्यासाठीच्या प्रक्रियेला गती आलेली आहे. धनुष 155/45 कॅलिबरच्या तोफांचे परीक्षण पोखरणमध्ये झालेले आहे. अशा 114 तोफा तयार करून भारतीय लष्कराला त्वरित पुरवाव्या असे आदेश ऑर्डनन्स फॅक्‍टरीला देण्यात आलेले आहेत.

के-9 वज्र 155मिमि/52 मिमी च्या हलक्‍या हॉवित्झर तोफा दक्षिण कोरिया तयार करणार असून 100 च्या पटीत भारताला देणार आहे. मेक इन इंडिया, अंतर्गत एल अँड टी कंपनीबरोबर करार करण्यात आलेला आहे. नोव्हेंबर 2018पर्यंत पहिल्या 10 तोफा येणार असून नोव्हेंबर 2019 पर्यंत 100तोफा पुरवण्यात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हलक्‍या वजनाच्या 145 हॉवित्झर तोफांपैकी 2 तोफा भारतात आलेल्या आहेत. मार्च 2019 ते जून 2021 या काळात दर महिन्याला 5-5 तोफा भारताला मिळणार आहेत. या अल्ट्रा लाईट तोफा चीन सीमेवर आणि अरुणाचल प्रदेश-लडाख सारख्या उंच प्रदेशात तैनात करण्यात येणार आहेत.

45 किमी पल्ला असणाऱ्या एटीजीएस तोफांची निर्मिती डीआरडीओ भारत फोर्सच्या सहकार्यांने निर्माण करत आहे. 2019 पूर्वी या तोफा लष्कराला मिळणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)