पाकिस्तान अंतराळ मोहिम राबवणार

इस्लामाबाद – पाकिस्तानने पुढील आर्थिक वर्षापासून महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतावर लक्ष ठेवण्यासाठी आणि नागरी आणि लष्करी कारणांसाठी भारतीय उपग्रहांवर अवलंबून रहायला लागू नये म्हणून पाकिस्तानने स्वतःचे उपग्रह अंतराळात सोडायचे ठरवले आहे, असे प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.

भारताबरोबर अमेरिका आणि फ्रान्सच्या उपग्रहांवरही पाकिस्तानला अवलंबून रहावे लागत असते. ते टाळण्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर उपग्रह अंतराळात सोडण्याच्या काही मोहिमा पाकिस्तान प्रथमच आखत आहे. पाकिस्तानची अंतराळ संशोधन संस्था “स्पेस ऍन्ड अप्पर ऍटमॉस्फियर रिसर्च ऑर्गनायजेशन’ (सुपार्को)च्या पुढील वर्षाच्या अंतराळ मोहिमेसाठी 4.70 अब्ज डॉलरची तरतूद केली गेली आहे.

-Ads-

यामध्ये 2.55 अब्ज डॉलरच्या तीन नवीन मोहिमांचा समावेश आहे, असे पाकिस्तानातील प्रमुख वर्तमानपत्राने म्हटले आहे. या संस्थेच्यावतीने 2005 पासून विद्यार्थ्यांसाठी अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जनजागृती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. कराची, लाहोर आणि इस्लामाबादेत अंतराळ केंद्र उभारण्यासाठी 1 अब्ज डॉलरची तरतूदही केली गेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)