पाकिस्तानी सैनिकांना रशियाकडून प्रशिक्षण

इस्लामाबाद – रशियाने पाकिस्तानातील सैनिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याचा करार केला असून त्यांनी आता पाकिस्तानी सैनिकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यास लवकरच प्रारंभ करायचे ठरवले आहे. रशिया आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त लष्करी सल्लागार समितीच्या काल झालेल्या पहिल्या बैठकीत या विषयीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

रशियन फेडरेशन ट्रेनिंग इन्स्टिट्युट मध्ये त्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रशिया आणि पाकिस्तान यांनी आपसातील लष्करी सहकार्य व संरक्षण विषयक अन्य सहकार्य अधिक व्यापक करण्याचे योजले असून सन 2014 पासून दोन्ही देशांमधील हे संरक्षण विषयक सहकार्य अधिक वेगवान झाले आहे. पाकिस्तानी लष्कराला दहशतवादी कारवायांचा आता मोठ्या प्रमाणात मुकाबला करावा लागत आहे. त्यासाठी त्यांना आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्याची आमची तयारी आहे असे रशियन लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

-Ads-

रशियाने गेल्या तीन वर्षात पाकिस्तानला एमआय-35एम जातीची चार लढाऊ विमाने दिली आहेत तसेच त्यांना मालवाहतुकीसाठीही काही हेलिकॉप्टर्स देऊ केली आहेत. आपसातील मैत्रीचे प्रतीक म्हणून दोन्ही देशांतील लष्कराच्या संयुक्त कवायतीही अलिकडच्या काळात आयोजित केल्या जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)