पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद

एका बालिकेचा मृत्यू; चौघे जखमी

श्रीनगर -पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाचे सत्र कायम ठेवत आज जम्मू-काश्‍मीरमध्ये पूँच, राजौरी आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये मारा केला. त्यात भारतील लष्कराचा एक जवान शहीद झाला. याशिवाय, एक बालिका मृत्युमुखी पडली तर चौघे जखमी झाले.

पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत भारतीय सीमा नाक्‍यांबरोबरच नागरी भागांना लक्ष्य केले. त्यांनी गोळीबाराबरोबरच तोफगोळ्यांचा मारा केला. भारतीय लष्कराच्या बंकरवर आदळून एका तोफगोळ्याचा स्फोट झाल्याने मुदस्सर अहमद (वय 37) हे लष्कराचे नाईक मृत्युमुखी पडले. पाकिस्तानी सैनिकांनी बालाकोट, मांजाकोट आणि बारोटी क्षेत्रांमध्ये नागरी भागांवर मारा केला. त्यात सजदा नावाची 9 वर्षीय बालिका मृत्युमुखी पडली. पाकिस्तानी माऱ्यात जखमी झालेल्यांमध्ये एका लष्करी जवानाचाही समावेश आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या नापाक माऱ्यामुळे मांजाकोट आणि बालाकोट क्षेत्रांमधील सीमेलगतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या. याशिवाय, ग्रामस्थांना घरांमधून बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला.

पाकिस्तानी आगळिकीला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये काही काळ धुमश्‍चक्री झाली. चालू महिन्यात पाकिस्तानी सैनिकांनी एलओसीलगत शस्त्रसंधी भंगाचे सत्रच आरंभले आहे. त्यांनी जुलैमध्ये केलेल्या माऱ्यात 7 जण मृत्युमुखी पडले. त्यात 4 शहीद जवानांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)