पाकिस्तानी मुत्सद्यांवर अमेरिकेचे 1 मे पासून निर्बंध 

वॉशिंग्टन (अमेरिका)- अमेरिकेतील पाकिस्तानी मुत्सद्यांवर 1 मे पासून निर्बंध घालण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. 1 मे नंतर पाकिस्तानी मुत्सद्यांना त्यांच्या मुख्यालयापासून 40 किमीच्या परिसरात राहावे लागणार आहे. त्यापलीकडे प्रवास करायचा असेल तर किमान 5 दिवस अगोदर त्यांना त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.

पाकिस्तानने अमेरिकन मुत्सद्यांवर निर्बंध घातल्यानंतर अमेरिकेने हा निर्णय घेतलेला आहे. पाकिस्तानमधील अमेरिकन मुत्सद्यांना कराचीत आणि आदिवासी भागांमध्ये जाण्यास मनाई केलेली आहे. त्याची परतफेड म्हणून अमेरिकेनेही 40 किमी अंतराचे निर्बंध घातले आहेत.
अमेरिकन मुत्सद्यांना कराची आणि आदिवासी भागात जाण्यावर निर्बंध घातलेले नाहीत, तर ती त्यांच्या सुरक्षेसाठी घेतलेली खबरदारी आहे, असा खुलासा पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

-Ads-

अशा प्रकारचे निर्बंध हे सामान्यत: परतफेडीच्या स्वरूपाचे असतात. त्यामुळे त्याबाबत अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही, असे अमेरिकेचे राजकीय व्यवहार राज्यमंत्री थॉमस शॅनन यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. अमेरिकेने घातलेल्या पाकिस्तानी मुत्सद्यांवरील निर्बंधाबाबत ते बोलत होते.

मोटर अपघातात एका पाकिस्तानी नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या एका अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याच्या हालचालीवर पाकिस्तानने घातलेल्या निर्बंधांचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिका आणि पाकिस्तान, दोन्ही देशांनी दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)