पाकिस्तानी माऱ्यात भारतीय जवान शहीद 

जम्मू – पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी पुन्हा आगळीक करत भारतीय हद्दीत मारा केला. त्यांनी अतिशय जवळूून केलेल्या गोळीबारात (स्नाईपर फायर) भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. ही घटना नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत जम्मू-काश्‍मीरच्या राजौरी जिल्ह्यात घडली.

पाकिस्तानी सैनिकांनी सकाळच्या सुमारास शस्त्रसंधीचा भंग करून सुंदरबनी क्षेत्रात गोळीबार केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे रायफलमन वरूण कट्टल (वय 21) मृत्युमुखी पडले. ते जम्मू-काश्‍मीरच्या सांबा जिल्ह्याचे रहिवासी होते. दरम्यान, भारतीय जवानांनी पाकिस्तानी माऱ्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानी सैनिकांनी मागील पाच दिवसांत तब्बल तीन वेळा स्नाईपर फायर केला. त्यांनी 6 नोव्हेंबरला केलेल्या माऱ्यात एक जवान जखमी झाला. त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी पुन्हा अखनूर क्षेत्रात केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक मजूर मृत्युमुखी पडला होता. चालू वर्षात पाकिस्तानी आगळिकींचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी मागील आठ वर्षांतील उच्चांक गाठताना यंदा तब्बल 1 हजार 435 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला. त्यांनी केलेल्या माऱ्यात सात महिन्यांमध्ये 52 जण मृत्युमुखी पडले, तर 232 जण जखमी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)