पाकिस्तानी बोटवर कोस्टगार्डची कारवाई; 500 कोटींचे अंमलीपदार्थ जप्त

प्रातिनिधिक छायाचित्र

9 ड्रग्ज माफियांना अटक ः 

अहमदाबाद – पोरबंदरमध्ये गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डने ड्रग्ज माफियांवर कारवाई केली आहे. कोस्ट गार्ड आणि एटीएसच्या टीमला पाहून ड्रग्ज माफियांनी बोट स्फोटकांनी उडवून ड्रग्ज साठा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानमधून बोटीतून ड्रग्ज आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी गुजरात एटीएसने 9 ड्रग्ज माफियांना अटक केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गुजरातच्या पोरबंदरजवळ पाकिस्तानकडून अमली पदार्थांची तस्करी करणारी बोट भारतीय तटरक्षक दलाने उद्‌ध्वस्त केली आहे. गुजरात एटीएस आणि तटरक्षक दलाने ही मोठी कारवाई केली आहे. तर तब्बल 100 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याची किंमत सुमारे 500 कोटी रुपयांच्या घरात आहे.

गेल्या 3 दिवसांपासून गुजरात एटीएस पोरबंदराजवळ गस्त घालून होती. पाकिस्तानमधून भारतात समुद्रामार्गे अमली पदार्थ पोहचवले जात असल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली. त्यानंतर मोठा सापळा रचत ही कारवाई करण्यात आली आहे.
अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये पाकिस्तानच्या हमिद मलिक नावाच्या व्यक्तीचे नाव पुढे येत आहे. पाकिस्तानमधून भारतात अमली पदार्थ पाठवण्याची जबाबदारी ही हमीदकडे होती, अशी माहितीही एटीएसकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, बोट पोरबंदर येथे आल्यानंतर समुद्रात गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्ड आपल्यावर कारवाई करणार या भीतीने बोटवरील ड्रग माफियांनी बोट उडवली. मात्र एटीएस आणि कोस्ट गार्डने बोटवरील 9 जणांना अटक केली आहे. हे सर्वजण इराणी नागरिक असल्याचे समोर येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)