पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्याचा आणखी एका हुरियत नेत्याला फोन

इस्लामाबाद/श्रीनगर, -पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आणखी एका हुरियत नेत्याशी फोनवर बोलणी केली आहेत. अलीकडेच फुटीरवादी नेते मीरवाईज उमर फारूक यांच्याशी फोनवर बोलणी केल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला कडक इशारा दिला होता. मात्र त्याचा काहीही परिणाम झाल्याचे दिसून आलेला नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हुर्रियत नेते सैयद अली शाह यांच्याशी बोलणी केली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्‍मीर भेटीपूर्वी, शनिवारी कुरेशी यांनी गिलानीबरोबर बोलणी केली. त्यांच्यात काश्‍मीर मुद्‌द्‌यावर बोलणी झाल्याचे समजते. मात्र त्याबाबत भारताने अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुरेशी मीरवाईज यांना फोन केल्यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्‍त सोहेल महमूद यांना बोलावून घेतले होते. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची ही हरकत म्हणजे भारताच्या अंतर्गत मामल्यात ढवळाढवळ करण्याचा, भारताच्या एकतेला हानी पोहचवण्याचा प्रकार आहे. जम्मू काश्‍मीरसंबंधित कोणत्याही गोष्टीत दखल देण्याचा पाकिस्ताला अधिकार नाही, असे पाकिस्तानला कडक इशारा देताना सांगितले होते. आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये पाकिस्तानला कडक शब्दात समज दिली होती, मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)