पाकिस्तानी नागरिकाकडून सागरीमार्गे घुसखोरीची शक्‍यता

गुजरातच्या कच्छमध्ये अलर्ट जारी
भुज  – केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी एका पाकिस्तानी नागरिकाकडून सागरीमार्गे घुसखोरी होण्याची शक्‍यता वर्तवणारा इशारा दिला आहे. त्यामुळे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
गुप्तचर यंत्रणांनी गुरूवारी रात्री दिलेल्या इशाऱ्यानुसार दोन नावा कच्छ जिल्ह्यातील जाखू बंदरावर येण्याची शक्‍यता आहे. एक नाव आंध्रप्रदेशातील बंदरावरून जाखूकडे निघाली. जाखूपासून काही अंतरावर खोल समुद्रात त्या नावेला पाकिस्तानमधून आलेली दुसरी नाव मिळाली. दुसऱ्या नावेतील एक पाकिस्तानी नागरिक पहिल्या नावेत बसला. त्यानंतर दोन्ही नावा जाखूकडे निघाल्या, असेही इशाऱ्यात स्पष्ट करण्यात आले. हा इशारा मिळाल्यानंतर कच्छ पोलिसांनी संबंधित भागांमध्ये प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली. याशिवाय, प्रत्येक हॉटेल आणि लॉजचीही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. तूर्त तरी पोलिसांना काहीच संशयास्पद आढळलेले नाही. मात्र, पोलीस सर्वतोपरी सतर्कता बाळगत आहेत. पाकिस्तानी नागरिकाने खरोखरीच घुसखोरी केली आहे का आणि त्याचे मनसुबे काय आहेत, याबाबतची माहिती तातडीने मिळू शकलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)