जम्मू – पाकिस्तानी सैनिकांनी कुरापत काढून केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान जखमी झाला. ही घटना जम्मू-काश्‍मीरच्या राजौरी जिल्ह्यात घडली. पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी सकाळी शस्त्रसंधीचा भंग केला. त्यांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या नौशेरा क्षेत्रातील भारतीय लष्कराच्या सीमा नाक्‍यांवर मारा केला. त्या माऱ्यात जखमी झालेल्या जवानाला उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या प्रकृतीला कुठलाही धोका नसल्याचे समजते. दरम्यान, पाकिस्तानी माऱ्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानी सैनिकांकडून वारंवार शस्त्रसंधीचा भंग केला जातो. त्यांच्या माऱ्याला जबरदस्त प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्यामध्ये मोठी हानी होत असूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच असल्याचे आढळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)