पाकिस्तानी गोळीबारात लष्करी हमालाचा मृत्यू

श्रीनगर – पाकिस्तानी सैनिकांनी कुरापतीचे सत्र कायम ठेवत आज भारतीय हद्दीत मारा केला. त्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराच्या एका हमालाचा मृत्यू झाला. ही घटना जम्मू-काश्‍मीरच्या उरी क्षेत्रात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली.

पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचा भंग करत चौकास भागात मारा केला. त्यात भारतीय लष्करासाठी हमाल म्हणून कार्यरत असणारे खुर्शिद अहमद (वय 37) मृत्युमुखी पडले. ते उत्तर काश्‍मीरचे रहिवासी होते. पाकिस्तानी सैनिकांकडून सातत्याने कुरापती काढल्या जात आहेत. त्यांनी चालू वर्षात 650 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय हद्दीत मारा केला आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)