पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना ईडीची नोटीस

नवी दिल्ली – प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. फेमा (FEMA) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांच्यावर परकीय चलन तस्करीचा आरोप आहे.

राहत फतेह अली खान यांनी अवैधरित्या ३, ४० हजार यूएस डॉलरची कमाई केली. यापैकी २, २५ हजार डॉलरची तस्करी केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात ईडीने कारणे दाखवा नोटीस बजावली असून राहत फतेह अली खान समाधानकारक उत्तर देण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली जाऊ शकते. तसेच रकमेवर ३०० टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाऊ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, याआधीही २०११ मध्ये राहत फतेह अली खान यांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सव्वा लाख डॉलरसोबत पकडले होते. यावेळी पैश्यांसंबंधी कोणतेही कागदपत्रे सादर करू शकले नाही. यामुळे राहत फतेह अली खान यांच्यासोबत त्यांच्या मॅनेजरलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)