पाकिस्तानी उपउच्चायुक्तांना बोलावून भारताने केली कानउघडणी

नवी दिल्ली – भारताने पाकिस्तानचे उपउच्चायुक्त सैद हैदर शाह यांना बोलावून त्यांच्या देशाच्या शस्त्रसंधी भंगाच्या कृत्याबद्दल त्यांची कानउघाडणी केली. पाकिस्तानी सैनिकांनी रविवारी आगळीक करताना जम्मू-काश्‍मीरच्या भिंबेर गली क्षेत्रातील नागरी भागावर मारा केला. त्यात एकाच भारतीय कुटूंबातील पाच निष्पाप सदस्य मृत्युमुखी पडले. या नापाक कृत्याचा भारताने शाह यांच्याकडे तीव्र शब्दांत निषेध केला.

पाकिस्तान हेतुपुरस्सर निष्पाप नागरिकांना लक्ष्य करत आहे. अशाप्रकारची निंद्य कृती मानवतावादी निकषांच्या आणि योग्य लष्करी वर्तणुकीच्या विरोधातील आहे, असे शाह यांना सुनावण्यात आले. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचा भंग केला जातो. त्याला भारतीय सुरक्षा दलांकडून दिल्या जाणाऱ्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानची मोठी हानी होऊनही तो देश धडा घेत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)