इस्लामाबाद – पाकिस्तानचे नवे अध्यक्ष डॉ आरिफ अल्वी यांचे भारताशीही वेगळे कनेक्‍शन आहे. त्यांचे वडिल डॉ. हबीब उर रहमान अल्वी हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे दंतवैद्यक होते. त्यांचे कुटुंबीय हे फाळणीच्यावेळी भारतातून पाकिस्तानात दाखल झाले आहे. त्यांच्या या नेहरू कनेक्‍शन विषयी त्यांच्या पीटीआय पक्षानेच ही माहिती प्रसृत केली आहे.

आजही त्यांच्या कुटुंबाकडे नेहरूंनी त्यांना पाठवलेल्या पत्राचा ठेवा जपण्यात आला आहे. फाळणीनंतर हे कुटुंब कराचीत स्थिरावले. नवीन अध्यक्षांच्या कुटुंबाचे पाकिस्तानचे संस्थापक बॅ जीना यांच्याशीही थेट संबंध होते. जिना यांच्या भगिनी शिरीनबाई जिना यांनी जो एक ट्रस्ट स्थापन केला होता त्या ट्रस्ट मध्ये अध्यक्ष अल्वी यांच्या वडिलांना शिरीनबाईंनी विश्‍वस्त नेमले होते.

विद्यमान अध्यक्ष डॉ आरिफ अल्वी हेही स्वत: डेन्टिस्ट आहेत. ते 1996 साली इम्रानखान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाचे संस्थापक सदस्य बनले. त्यांनी पक्षाची घटना लिहीण्यात मोठे योगदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)