पाकिस्तानी अधिकाऱ्याने चोरले कुवैतच्या राजदूताचे पाकिट-व्हिडियो व्हायरल 

इस्लामाबाद (पाकिस्तान): पाकिस्तानच्या संयुक्‍त सचिव दर्जाच्या एका अधिकाऱ्याने केलेल्या चोरीमुळे पाकिस्तानला जगभरात खाली मान घालण्याची पाळी आली आहे. पाकिस्तान आणि कुवैत यांच्या एका मंत्रिस्तरीय बैठकीच्या वेळी ही घटना घडली आहे. कुवैतच्या राजदूताने आपले पैशांचे पाकिट चोरीला गेले आहे अशी तक्रार केल्यानंतर सीसीटीव्ही फूटेज तपासताना गुंतवणूक आणि सुविधा विभागाचे संयुक्त सचिव जर्रार हैदर खान यांनी कुवैतच्या राजदूताचे पैशांचे पाकिट टेबलावरून उचलून आपल्या कोटाच्या खिशात घातल्यचे उघडकीस आले. शुक्रवारी बैठकीत भाग घेणारे प्रतिनिधी हॉलमधून बाहेर गेले असता, गुंतवणूक आणि विभागाचे संयुक्त सचिव जर्रार हैदर खान यांनी हॉलमध्ये प्रवेश केला आणि कुवैतच्या राजदूतांच्या टेबलावर असलेले दीनारनी भरलेले पाकिट उचलून आपल्या खिशात टाकले.
नंतर जर्रार हैदर खान यांना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडील कुवैतच्या राजदूताचे पैशांचे पाकिट जप्त करण्यात आले आहे. जर्रार हैदर खान यांचे हे कृत्य दुर्भाग्यपूर्ण असून त्यांच्या या कृत्याने संपूर्ण जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाल्याचे एका पाकिस्तानी अधिकऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. जर्रार हैदर खान यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एका वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकाराने या चोरीच्या घटनेचा व्हिडियो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केला असून तो जगभर व्हायरल झाला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)