पाकिस्तानात 500 हिंदूंचे धर्मांतर-निर्वासित संघटनेचा आरोप

जयपूर (राजस्थान) -राजस्थान सीमेपलीकडे सिंध प्रांतात हिंदूंची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तेथे हिंदूचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात आहे. आज 500 हिदूंचे धर्मांतर होत असून त्याच्या जाहिरातीही वाटल्या जात आहेत अशी माहिती पाकिस्तानी हिंदूंसाठी काम करणाऱ्या लोक सीमांत संघटनेने दिली आहे.

धर्मांतर केल्या जात असलेल्या या 500 जणांमध्ये 5 ऑगस्ट रोजी भारतातून हद्दपार करण्यात आलेला 80 वर्षीय चंदू, त्याची पत्नी धामी, मुलगा भगावान, सून धर्मी आणि 4 मुलांचा समावेश आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने सुटीच्या दिवशी खास सुनावणी करून त्यांच्या हद्दपारीवर मनाई आणली होती, पंण त्यावर कारवाई होण्यापूर्वीच त्यांची ट्रेन पाकिस्तानी हद्दीत गेली होती. असे लोक सीमांत संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंह सोढा यांनी दिली आहे.

पाकिस्तानमधील हिंदूंची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे त्यांनी सांगितले. अस्तित्वासाठी धर्म बदलावा लागणे ही त्यांची लाचारी बनली आहे. धर्म बदलणारांना अनेके संघटना राहण्यायोग्य घर, सामान, काम करण्यासाठी शिवणयंत्रासारखी साधने, शेतीसाठी वर्षभर पाण्याचे आमिष दाखवतात. थारपारकर आणि उमरकोट जिल्ह्यांमध्ये जबरदस्ती धर्मांतराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)