पाकिस्तानात 200 महिलांना ब्लॅकमेल करणारास 24 वर्षे तुरुंगवास

इस्लामाबाद (पाकिस्तान): 200 महिलांना ब्लॅकमेल करणारास पाकिस्तानी न्यायालयाने 24 वर्षांची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड ठोठावला आहे. या दोनशे महिलांमध्ये डॉक्‍टर्स आणि नर्सेसचा समावेश आहे. अब्दुल वाहब नावाच्या या ब्लॅकमेलरने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या महिलांना ब्लॅकमेल केले होते. पंजाब प्रांतातील लय्याह जिल्ह्याचा रहिवासी अब्दुल वाहबला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती.

लष्करी गुप्तहेर खात्यातील अधिकारी असल्याचा बहाणा करून अब्दुल वाहब या महिलांना धमकी देत असे. की तुमचे आपत्तीजनक अवस्थेतील फोटो आपल्याकडे आहेत. माझे ऐकले नाही तर ते मी तुमच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करीन.
अब्दुल वाहबच्या विरोधात साक्ष देण्यासाठी 31 महिला न्यायालयात आल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपले अशील निर्दोष असून त्याला अडकवण्यासाठी खोटी तक्रार नोंदवण्यात आली असल्याचा युक्तिवाद अब्दुल वाहबच्या वकिलाने केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. लाहोरच्या सरकारी मेडिकल कॉलेजच्या डॉक्‍टर्स आणि नर्सेससह 200 जणींना ब्लॅकमेल करून अब्दुल वाहबने त्यांचे शोषण केले.

अब्दुल वाहबला झालेली शिक्षा सोशल मीडियावरील अपराधांसंबधात पाकिस्तानमधील आजवरची सर्वात मोठी शिक्षा आहे. लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात त्याची रवानगी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)