पाकिस्तानात 14 दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा 

इस्लामाबाद: 14 दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असून या निर्णयावर पाकिस्तानचे सेना प्रमुख जनरल कमर जावेद यांनी शिक्कामोर्तब केले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये हे 14 जण सहभागी होते.

या दहशतवाद्यांनी डिसेंबर 2014 साली पेशावरमध्ये एका शाळेवर हल्ला केला होता. या हल्ल्‌यात 150 मुलांची हत्या करण्यात आली होती. याच बरोबर सशस्त्र दलांवरती हल्ला करणे, कायदा अंमलबजावणी संस्थेवर हल्ला करणे, निष्पाप मुलांची हत्या आणि शिक्षण संस्थेला उद्धवस्थ करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यातसुध्दा हे दहशतवादी दोषी सिध्द झाले आहेत. या घटनेनंतर दहशतवाद्यांविरूध्द चालू असलेल्या कारवाईला गती प्राप्त व्हावी म्हणून सैन्य न्यायालयाची निर्मिती करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)