पाकिस्तानात लोकशाही नाही, लष्करी राजवट आहे – रेहम खान 

लंडन (इंग्लंड): पाकिस्तानमध्ये लोकशाही नाही, तर लष्करी राजवट चालू असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांची पूर्व पत्नी रेहम खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थिती उघड करताना रेहम खान यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानात लोकशाही नावालासुद्धा राहिली नसून, सारा कारभार लष्करच चालवत आहे. जिथे जनतेला सांगितल्याविना, संसदेला विश्‍वासात घेतल्याविना, सल्ला घेतल्याविना निर्णय घेतले जातात. तिथे लोकशाही आहे असे कसे म्हणावे?  त्यापेक्षा त्यांनी पाकिस्तानात लष्करी राजवट चालू आहे असे उघडपणे जाहीर करून टाकावे. असे रेहम खान म्हणाल्या.

एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर रेहम खान बोलत होत्या. पाकिस्तानच्या गरिबीविषयी बोलताना रेहम खान यांनी सांगितले, की सध्या पाकिस्तान अत्यंत दुर्दैवी परिस्थितीतून जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान उघड उघड सौदी अरबमध्ये जाऊन पाकिस्तानच्या गरिबीची जाहीर चर्चा करतात. आमच्याकडे पैसा नाही म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या देशाचा असा अपमान कोणीही करणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मुद्‌द्‌यावर संसदेत चर्चा व्हावी अशी रहम खान यांनी मागणी केली आहे. ज्या प्रकारे भीक म्हणून आम्हाला मदत मिळाली आहे, आणि ज्या अटींवर मिळाली आहे, त्यावर संसदेवर चर्चा व्हावी. जर नवाज शरीफ यांनी असे केले असते, तर त्यावर वेगळ्या प्रतिक्रिया जाहीर झाल्या असत्या.

आर्थिक टंचाईत सापडलेल्या पाकिस्तानला मदत केल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी एका सार्वजनिक सभेत सौदी अरबचे जाहीर आभार मानले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)