पाकिस्तानात ‘बाहुबली 2’ ची छप्पर फाड कमाई

दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या बाहुबली 2 या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई केली आहेच मात्र, जगभरातही या सिनेमाने बॉक्‍स ऑफिसवर 1,475 कोटींचा आकडा पार केला. त्यानंतर आता पाकिस्तानातही बाहुबली 2 ला बंपर ओपनिंग मिळाले आहे. पहिल्या वीकेंडलाच पाकमध्ये या सिनेमाने साडेचार कोटी रुपयांची कमाई केली आहे.
बाहुबली 2 हा पाकिस्तानात रिलीज झालेला पहिला डब केलेला प्रादेशिक चित्रपट आहे. पाकिस्तानात बाहुबली 2 हा 100 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर झळकला आहे. चित्रपटाच्या कथानकात हिंदू पुराण आणि परंपरांवर भर असला, तरी पाकमधील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाकिस्तानचे सिनेवितरक अमजद रशिद यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने एकही कट न सुचवता, यू प्रमाणपत्रासह बाहुबली 2 हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित केला आहे. पाकिस्तानात पहिल्या आठवड्याभरात हा सिनेमा सहा कोटींची कमाई करेल असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)