पाकिस्तानात पहिलाच शीख ‘न्युजअँकर’  

कराची : पहिल्यांदाच पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीने एका शीख माणसाला न्यूज अँकर म्हणून ठेवले आहे. हरमित सिंग हे खैबर पख्तुख्वा प्रांताच्या चेक्सार शहराचे रहिवासी असुन आता एका पब्लिक न्यूज वाहिनीचे सदस्य आहेत. मिडिया हाऊसच्या अधिकृत हँडलरने एका ट्विटवर सिंग यांचा फोटो पोस्ट केला करुन “पाकिस्तानचे पहिले शीख न्यूज अँकर हरमीत सिंग फक्त पब्लिक न्यूजवर” असे लिहिले आहे. नुकतीच, मनमीत कौर पाकिस्तानमधील पहिली महिला शीख रिपोर्टर बनली आहे.

सिंग म्हणाले की, मला पहिल्या पासुनच पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांमध्ये काम करण्यात रस होता.
मी माध्यमामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कोणत्याही धर्म कार्डचा वापर केला नाही. मी खूप मेहनत करुन आज इथे आहे.
पब्लिक न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मिस युसफ बेग मिर्झा यांनी सांगितले की, सिंग यांची चमकदार नजर आणि आवाजामुळे त्यांना ‘न्यूज अँकर’ म्हणून निवडले गेले. सिंग यांनी फेडरेशन ऑफ उर्दू युनिव्हर्सिटी कराचीतून पत्रकारितामध्ये मास्टर्स पूर्ण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)