पाकिस्तानात जुलै महिन्यात सार्वत्रिक निवडणूका

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने देशातील सार्वत्रिक निवडणूकांसाठी 25 जुलै ते 27 जुलै अशा तारखा निश्‍चीत केल्या आहेत. यापैकी एक तारीख निश्‍चीत करावी असा प्रस्ताव निवडणूक आयोगाने राष्ट्रपती मामून हुसेन यांच्याकडे पाठवला आहे. त्या देशातील विद्यमान सरकारची मुदत मे 31 रोजी संपत आहे. त्यानंतर दोन महिन्यांनी ही निवडणूक होणार असून तेवढ्या कालावधीसाठी देशाला काळजीवाहू पंतप्रधान नेमावा लागणार आहे. त्यासाठीच्या नावाची चर्चा आता तेथे सुरू झाली आहे.

पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहीद खान अब्बासी यांनी या संबंधात गेल्याच आठवड्यात विरोधी पक्ष नते खुर्शिद शाह यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांची अंतिम बैठक उद्या होणार असून त्यात या विषयी निर्णय होणार आहे. कालच पंतप्रधान अब्बासी यांनी या विषयावर माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली.

पाकिस्तान मुस्लिम लीगचाच प्रतिनिधी काळजीवाहू पंतप्रधान होणार आहे असे सांगण्यात येते. पण उमेदवारीवरून पक्षात टोकाचे मतभेद झाले तर हे पद विरोधी पक्षाकडे देण्यासही नवाज शरीफ राजी आहेत असेही सांगितले जात आहे. हे नाव उद्याच निश्‍चीत होईल असेही सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)