पाकिस्तानात क्रिकेट सामन्यातील विजयोत्सवादरम्यान गोळीबार ; 1 ठार

कराची, दि. 20- चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरोधात विजय मिळवल्याबद्दल पाकिस्तानमध्ये झालेल्या विजयोत्सवादरम्यान काही उत्साही युवकांनी गोळीबार केल्याने एकजण ठार झाला. सय्यद हुसैन राझा झैदी या 15 वर्षाच्या मुलाला यावेळी गोळी लागली. जिना मेडिकल सेंटरमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली, परंतू तो जिवंत वाचू शकला नाही. त्यामुळे क्रिकेटच्या सामन्यतील विजयाचे पर्यावसन कटू दुःखात झाले.
पाकिस्तानमध्ये अनेकवेळा आनंदाच्या प्रसंगी हवेत गोळीबार केला जात असतो. अधून मधून घडणाऱ्या अशा घटनांमध्ये काही जण जखमी झाल्याच्याही बातम्या येत असतात. रविवारच्या क्रिकेट सामन्यासाठी मोकळ्या मैदानावरच थिएटर उभे केले गेले होते. सामन्यानंतर झालेल्या विजयोत्सवात काही युवकांनी हवेत गोळीबार केला होता. यावेळी जवळच घराच्या बाल्कनीमध्ये उभ्या असलेल्या मुलाला गोळी लागली.
अशाच एका घटनेमध्ये हवेत गोळीबार करून आनंदोत्सव करणाऱ्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते अमानुल्लाह मेहसूद यांनाह्यी अटक करण्यात आली आहे. तर खैबर पख्तुनवा प्रांतातही काही ठिकाणी हवेत गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)