पाकिस्तानातील स्फोटात 25 ठार ; 35 हून अधिक लोक जखमी

खैबर पख्तुनवा प्रांतातील प्रकार

पेशावर: पाकिस्तानातल्या अशांत खैबर पख्तुनवा प्रांतात एका धार्मिक स्थळाजवळ झालेल्या एका शक्तीशाली बॉंबस्फोटात 25 जण ठार झाले तर अन्य 35 जण जखमी झाले आहेत. औकारझाई या अदिवासी जिल्ह्यातील कलाया भागात हा प्रकार घडला. तेथे गजबलेल्या वस्तीतील शिया पंथीयांच्या मशिदी जवळ हा बॉंब पेरून ठेवण्यात आला होता. त्याचा मोठा धमाका झाला. आजुबाजुला मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने जीवित हानीही मोठ्या प्रमाणावर झाली. ठार झालेले बहुतेक जण शिया पंथीय आहेत.

-Ads-

मृतांची व जखमींची संख्या मोठी असल्याने हॉस्पीटल मध्ये आणिबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली. तेथे मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय पथके आणि वैद्यकीय सामग्री पाठवण्यात आली आहे. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करून त्या प्रांताचे मुख्यमंत्री मेहमुद खान म्हणाले की आमच्या प्रातांत असलेली शांतता आमच्या शत्रुंच्या डोळ्यात खुपली असावी म्हणून त्यांनी तेथे हा प्रकार केला आहे. दरम्यान हा प्रकार नेमक्‍या कोणत्या संघटनेने केला आहे त्याची माहिती लगेच मिळू शकली नाही. या प्रकारामुळे धास्तावलेल्या शिया पंथीयांनी एकत्र येत या घटनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)