पाकिस्तानातील सुफी दर्ग्यावर इसिसचा हल्ला, 100 ठार

इस्लामाबाद – पाकिस्तानातील सेहवान येथील लाल शाहबाज कलंदर सुफी दर्ग्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांना रुणालयात दाखल करण्यात आले असून या हल्ल्याची जबाबदारी इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

स्फोटाच्या वेळी दर्गा परिसरात लोकांची मोठी गर्दी होती. पाकिस्तानमध्ये एकाच आठवड्याच्या आत हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे. दर्ग्यात महिलांसाठी आरक्षित असलेल्या भागात आत्मघाती हल्ला करण्यात आल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)