पाकिस्तानातील चौकाला शहीद भगत सिंह यांचे नाव द्यावे – न्यायालय

पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील शादमान चौकाला शहीद भगत सिंह यांचे नाव देण्याचा आदेश लाहोर उच्च न्यायालयाने दिला आहे. भगत सिंह मेमोरियल फाऊंडेशनचे अध्यक्ष इम्तियाझ रशीद कुरेशी यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणीच्या दरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

पकिस्तानमधील शादमान चौकाचे नाव बदलून शहीद भगत सिंह चौक करावे अशी इम्तियाझ रशीद कुरेशी यांची मागणी होती. 87 वर्षांपूर्वी, 23 मार्च 1931 रोजी भगत सिंह आणि त्यांचे साथी क्रांतीकारक राजगुरू व सुखदेव यांना ब्रिटिश सरकारने तत्कालीन लाहोर तुरुंगात फाशी दिली होती. भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव हे स्वातंत्र्य सेनानी आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. त्यामुळे शहीद भगत सिंह यांचे नाव चौकाला द्यावे अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती. पकिस्तानचे संस्थापक कायदे आझम महंमद अली जिना यांनीही शहीद भगत सिंह यांना श्रद्धांजली वाहिली होती. भगत सिंहसारखा बहादूर आपण साऱ्या भारतखंडात पाहिला नाही, शादमान चौकाला भगत सिंह यांचे नाव देणे न्याय्य होईल, असे जिना म्हणाले होते.

कायद्याच्या चौकटीत राहून शादमान चौकाला शहीद भगत सिंह यांचे नाव देण्याबाबत निर्णय घ्यावा, असा आदेश लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शाहिद जमील खान यांनी लाहोर उपायुक्तांना दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)