पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला पंजाबमध्ये अटक

अमृतसर – पंजाबमध्ये पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक करण्यात आली. रवि कुमार असे संबंधित हेराचे नाव असून त्याला अमृतसर जिल्ह्यात पकडण्यात आले. त्याच्याकडे लष्कराबाबतची संवेदनशील माहिती आणि महत्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे आढळली.

काही महिन्यांपूर्वी कुमार फेसबुकवरून इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका अधिकाऱ्याचा संपर्कात आला. त्यानंतर मागील महिन्यात आयएसआय अधिकाऱ्यांनी कुमारची दुबई भेट घडवून आणली. तिथे त्याच्यावर हेरगिरीविषयीची जबाबदारी सोपवण्यात आली. कुमारला आयएसआयकडून दुबईमार्गे पैसा पुरवला जात होता.

तो मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून आयएसआय अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात होता. कुमारची कसून चौकशी केली जात आहे. हेरगिरीत त्याचे स्थानिक पातळीवर कुणी साथीदार आहेत का, या दिशेने तपास सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)