पाकिस्तानसह १२४ देशांच्या गायकांनी गायले बापूंचे आवडते भजन 

नवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वच जण बापूंना आपआपल्यापरीने मानवंदना देत आहेत. अशातच जगातील १२४ देशांनी बापूंना अनोखी श्रद्धांजली दिली आहे.

१२४ देशातील प्रसिद्ध गायकांनी एकत्र येत महात्मा गांधींच्या आवडत्या भजनांमधील एक ‘वैष्णव जण तो तेने कहीए…’ हे भजन गायले आहे. राष्ट्रपती भवनात आज आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलना भरविण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडीओ लॉंच केला. या व्हिडिओमध्ये भारताचा शेजारी पाकिस्तानच्या गायकानेही भजन म्हंटले आहे. पाकिस्तानकडून शफकत अमानत अली यांनी आवाज दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)