पाकिस्तानला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत मोदी सरकार

नवी दिल्ली – पाकिस्तानला एक जोरदार धक्का देण्याच्या तयारीत मोदी सरकार आहे. हा धक्का देण्याची पूर्ण तयारी झाली आहे. रोहतक येथे तिसऱ्या कृषी नेतृत्व सम्मेलनाच्या समारोह समारंभात बोलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशी माहिती दिली. भारतातील तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाते. या तीनही नद्यांवर धरणे बांधून हे पाणी अडवले जाणार असल्याचे गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे.

सध्या हरियाणाला पाण्याचा टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा या नद्यांचे अडवलेले पाणी हरियानाला देऊन त्याची पाण्याची समस्या दूर करण्याची सरकारची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. या नद्यांचे पाणी प्रथम यमुनेत सोडले जाईल आणि नंतर त्याचा हरियणाला पुरवठा करण्यात येईल. यामुळे पिण्याच्या पाण्यची समस्या दूर होईल आणि त्याचा फायदा कृषी क्षेत्रालाही होईल.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना कृषी खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जे आश्‍वासन दिले आहे. त्याची पूर्तता करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)