पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पर्याय उपलब्ध 

भारतीय लष्कराचा घुसखोरीवरून इशारा

श्रीनगर  – नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलिकडून जम्मू-काश्‍मीरात घुसखोरीचे सत्र कायम असल्यावरून भारतीय लष्कराने पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. त्या देशाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आमच्याकडे पर्याय उपलब्ध असल्याचे लष्कराने म्हटले आहे.

शस्त्रसंधीचा भंग करून पाकिस्तानी लष्कर सातत्याने एलओसीलगत मारा करते. घुसखोरांना भारतीय हद्दीत शिरकाव करता यावा यासाठीची ती नापाक खेळी आहे, असे भारतीय लष्कराचे कमांडर रणबीर सिंह गुलमर्गमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पाकिस्तानच्या कुरापतींना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे धोरण आम्ही अवलंबले आहे. त्यामुळे शत्रुला मोठ्या दबावाखाली ठेवण्यात यश येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून कुठला पर्याय निवडायचा ते आम्ही ठरवू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. जम्मू-काश्‍मीरातील दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमांत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. मागील वर्षी 250 हून अधिक दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला. तर सुमारे 50 दहशतवाद्यांना पकडण्यात आले. काश्‍मीर खोऱ्यातील युवकांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्यासाठी पाकिस्तान खोटी आश्‍वासने देत आहे. त्यासाठी त्या देशाकडून सोशल मीडियाचा वापर केला जातो. अर्थात, मागील पाच महिन्यांत दहशतवादी भरतीचे प्रमाण घटले आहे, असे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)