पाकिस्तानला कर्जात गुंतवण्याच्या मुद्‌यावर चीनची सारवासारव

पेशावर (पाकिस्तान ): पाकिस्तानवर कोणत्याही प्रकारे कर्ज लादलेले नाही, पाकिस्तानला कर्जात गुंतवण्याचा हेतू नाही, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे, वांग यी तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर असून पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दोन देशांत प्रथमच उच्चस्तरीय चर्चा होत आहे. बेल्ट अँड रोड प्रकल्पासाठी चीनने पाकिस्तानला 57 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे, त्याचे समर्थन करताना वांग यी यांनी हा खुलासा केला आहे. पाकिस्तानवरील सध्याचे आर्थिक संकट पाह्ता चीन शेजारी राष्ट्राना कर्ज देऊन गुंतवत आहे, असेच मत व्यक्त केले जात आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यसह घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत वांग यांनी सांगितले की सीपीईसी (चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) मुळे पाकिस्तानच्या आर्थिक विकासात एक-दोन टक्‍क्‍यांची वाढच झाली आहे. त्यात सुमारे 70 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना लाभ होणार आहे. मात्र पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता चीन पाकिस्तानला आणखी कर्ज देणार, की नाही याबाबत दोन्ही नेत्यांनी काही वक्तव्य केले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)