पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या ७३ टक्के लोकांची पाकिस्तान आवडत नसल्याची कबुली

इस्लामाबाद, दि. 13 – पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वात जास्त विक्री होणारं उर्दू वृत्तपत्र डेली मुजादालवर पाकिस्तान सरकारने बंदी आणली आहे. रावलकोट येथून प्रसिद्द होणा-या या वृत्तपत्राने पीओकेमधील लोकांशी संवाद साधत एक सर्व्हे केला होता. सर्व्हेदरम्यान पाकिस्तानात राहण्यासंबंधी तुमचं काय मत आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. एका वृत्तवाहिनीने  दिलेल्या वृत्तानुसार, 73 टक्के लोकांनी पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, विरोधात मत व्यक्त करत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेनंतर, पाकिस्तानात खळबळ माजली आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने कोणताही पूर्वसूचना न देता या वृत्तपत्राला टाळं ठोकलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)