पाकिस्तानमध्ये तीर्थयात्रेस गेलेल्या महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये दरवर्षी शिरोमणी गुरुद्वारा समितीतर्फे एका तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी शेकडो भाविक या यात्रेत सहभागी होतात. दरवर्षाप्रमाणे यंदाही या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या यात्रेत सहभागी झालेल्या एका भारतीय महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर केले असल्याची धक्कादायक माहिती सामोर आली आहे. दरम्यान, तिच्या कुटुंबीयांनी महिलेची सुटका करण्यासाठी सरकारकडे मदत मागितली आहे.

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात राहणारी किरन बाला ही महिला १२ एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये गेली होती. शिरोमणी गुरुद्वारा समितीतर्फे आयोजित तीर्थयात्रेत ती सहभागी झाली होती. या वर्षी १८०० भाविक पाकिस्तानमध्ये गेले आहे. यात किरण बालाचा समावेश आहे. पाच दिवसांपूर्वी किरण बाला बेपत्ता झाली. तिच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय देखील चिंतेत होते. दुसरीकडे किरण बालाने पाकिस्तानमधील भारतीय दुतावासाला एक पत्र पाठवले आहे. या पत्रात तिने दुसरे लग्न केल्याचा दावा केला आहे. किरण बालाच्या या पत्राने होशियारपूरमध्ये राहणाऱ्या तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. दरम्यान, सरकारने आपल्याला मदत करावी अशी विनंती तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)