पाकिस्तानमधील दहशतवाद अस्वीकारार्ह : हेली

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या प्रतिनिधी निक्की हेली यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांचे आश्रयस्थान होऊ देणार नसल्याचे विधान केले आहे. दहशतवाद्यांना आश्रय पुरवणाऱयांबद्दल आम्ही गप्प बसणार नाही. भारत आणि अमेरिकेने दहशतवादविरोधातील जागतिक लढय़ाचे नेतृत्व करावे असे हेली यांनी म्हटले आहे.

धर्माचे स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्यासारख्या देशांना सहिष्णुतेद्वारेच एकजूट ठेवले जाऊ शकते. चीनचा विस्तार अमेरिका तसेच अन्य देशांसाठी चिंतेचे कारण आहे. चीन लोकशाहीवादी मूल्ये मानत नसल्याने ही चिंता अधिक सतावणारी असल्याचे हेली म्हणाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंद-प्रशांत क्षेत्रात सागरी संचार स्वातंत्र्य आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याबद्दल सिंगापूरमधील शांगरी-ला चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचा उल्लेख हेली यांनी यावेळी केला. मोदींनी मांडलेल्या दृष्टीकोनाशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील सहमत आहेत. आण्विक पुरवठादार गटात (एनएसजी) भारताच्या प्रवेशाला अमेरिकेचा पाठिंबा आहे. अण्वस्त्रसज्ज असूनही भारत जागतिक आदरास पात्र ठरल्याचे उद्गार हेली यांनी ऑब्जर्वर रिसर्च फौंडेशनकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)