पाकिस्तानमधील डी-कंपनीचेही एकापेक्षा जास्त उद्योग-अमेरिका

वॉशिंग्टन : पाकिस्तानमधील डी-कंपनीचेही एकापेक्षा जास्त उद्योग आहेत अशी माहिती अमेरिकी कायदा प्रतिनिधींना देण्यात आली आहे. डी-कंपनीने अनेक क्षेत्रांमध्ये शिरकाव केला असल्याचेही त्यांना सांगण्यात आलं आहे. जॉर्ज मॅसन युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर लुईस शेली यांनी ही माहिती दिली आहे.

भारताने फरार घोषित केलेल्या दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीने अनेक देशांमध्ये पाय पसरले आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. डी-कंपनीने अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी अनेक देशात आपले जाळे तयार केले असून, एक मजबूत संघटना झाली आहे असं त्यांनी अमेरिकी कायदा प्रतिनिधींना सांगितलं.

शेली यांनी डी-कंपनीचे जाळे अनेक देशांमध्ये पसरले असल्याचा दावा केला आहे. दहशतवाद आणि बेकायदेशीर आर्थिक मदतीवर संसदेच्या आर्थिक सेवा संबंधी समितीकडून आयोजित चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. ‘मेक्सिकोमधील अंमली पदार्थ संघनांप्रमाणे डी-कंपनीचे जाळे वेगवगळ्या देशांमध्ये पसरले आहे. ते हत्यार, बनावट डीव्हीडींची तस्करी करतात आणि हवालाच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवण्याचं कामही करतात’.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)