पाकिस्तानमधील क्वेटा बॉंबस्फोटात किमान 15 जण ठार

क्वेटा (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या क्वेटा शहरात झालेल्या एका बॉंबस्फोटात किमान 15 जण ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. क्वेटाच्या बाजारातील गर्दीच्या ठिकाणी हा बॉंबस्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली आहे. मोटर सायकलवरील आत्मघातकी बॉंबरने 17 लष्करी जवानांना मारल्याचे इसिसने म्हटले आहे. अर्धसैनिक दलाची पलटण जात असताना हा हल्ला केल्याचे इसिसने म्हटले आहे.

हल्लेखोरांचे लक्ष्य अर्धसैनिक दलाचे जवान असू शकतील, पण ते निघून गेल्यानंतर हल्ला करण्यात आल्याचे बलुचिस्तानचे गृहमंत्री सरफराझ बुग्ती यांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 जण ठार झाले असून 40 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. क्वेटा शहरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे आणि सर्व हॉस्पिटल्सना सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी होणाऱ्या पाकिस्तानच्या सत्तरावा स्वातंत्र्यदिन सोहळा उधळून लावण्याचा या हल्ल्यामागे हेतू होता, असे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाज्वा यांनी एका ट्‌विटद्वारे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)