पाकिस्तानने हाफिज सईदच्या दहशतवादी संघटनेवरील बंदी उठवली 

इस्लामाबाद (पाकिस्तान): पाकिस्तानने कुख्यात दहशतवादी हाफिझ सईद याच्या जेयूडी (जमात उद दावा) या दहशतवादी संघटनेवरील बंदी उठवली आहे. त्याचप्रमाणे एफआयएफ (फलाह ए इन्सानियत फाऊंडेशन) वरीलही बंदी उठवली आहे. 26 नोव्हेंबरच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईदला संयुक्‍त राष्ट्रांनी दहशतवादी घोषित केले आहे आणि त्याच्या जेयूडी (जमात उद दावा) आणिं एफआयएफ (फलाह ए इन्सानियत फाऊंडेशन) या संघटनांचा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश केला आहे.

फेब्रुवारी 2018 मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रध्यक्ष ममनून हुसेन यांनी एका अध्यादेशाद्वारे दहशतवादविरोधी कायदा 1997 सुधारणा केली होती. त्यानुसार संयुक्त राष्ट्राच्या जेयूडी आणि एफआयफ यांचा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश करून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदर अध्यादेशाची मुदत गुरुवारी समाप्त झाली. आणि इम्रान खान सरकारने अध्यादेशाला मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे हाफिझ सईद याच्या दोनी संघटनांवरील बंदी आपोआप रद्द झाली आहे. हाफिझ सईदने आपेले वकील राज रिझवान अब्बासी आणि सोहेल यांच्यामार्फत अध्यादेशाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)