पाकिस्तानने भारतात घुसखोरी करणे थांबवावे अन्यथा… -लष्करप्रमुख  

नवी दिल्ली – पाकिस्तानने भारतात घुसखोरी करणे थांबवावे अन्यथा भारताकडे कारवाईचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अशा शब्दात लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तानला सुनावले. आज इन्फट्री दिनानिमित्त लष्करप्रमुखांनी दिल्लीतील इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्मारकाला भेट दिली आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जनरल रावत यांनी म्हंटले कि, भारतविरोधी कारवायांमध्ये यशस्वी होऊ शकत नाही, हे पाकिस्तानला माहिती आहे. त्यामुळेच दहशतवादासारखा मार्ग अवलंबावा लागत आहे. परंतु, आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहोत. ते पुढे म्हणाले, शुक्रवारी दगडफेक करणाऱ्यांच्या हल्ल्यात एक जवान शहिद झाला. तो लष्करासाठी रस्ते बांधण्याचे काम करणाऱ्या बॉर्डर रोड टीममध्ये कार्यरत होता. आणि आपल्याकडील काही लोक म्हणतात कि दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देऊ नका, असेही बिपीन रावत यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)