पाकिस्तानने पुन्हा वाजवले काश्‍मीर मुद्‌द्‌याचे तुणतुणे

संयुक्त राष्ट्रे -संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील चर्चेवेळी पाकिस्तानने जुन्या सवयीप्रमाणे पुन्हा काश्‍मीर मुद्‌द्‌याचे तुणतुणे वाजवले. याहीवेळी पाकिस्तानने मांडलेल्या भूमिकेला कुणाचाच पाठिंबा मिळाला नाही.

मध्य पूर्वेत असणाऱ्या अस्थिर स्थितीवर सुरक्षा परिषदेत चर्चा झाली. मात्र, या चर्चेचे गाडे पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी काश्‍मीर मुद्‌द्‌याकडे नेण्याचा प्रयत्न केला. पॅलेस्टिनींच्या वैध आकांक्षांना पाकिस्तानचा पाठिंबा कायम राहील. संयुक्त राष्ट्रांनीही आपली जबाबदारी निभवावी आणि पॅलेस्टाईन तसेच काश्‍मीरसारख्या प्रलंबित मुद्‌द्‌यांबाबत केलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीची निश्‍चिती करावी. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांवरील जगभरातील जनतेचा विश्‍वास कायम राहील, असे त्या म्हणाल्या.

-Ads-

काही दिवसांपूर्वीच लोधी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्‍मीर मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने त्यांच्यातील प्रलंबित मुद्दे चर्चेद्वारे सोडवावेत, अशी भूमिका मांडत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेर्रस यांनी याप्रकरणी मध्यस्थी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पाकिस्तानकडून वारंवार आंतरराष्ट्रीय समुदायाला मध्यस्थी करण्याचे साकडे घातले जाते. तर तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी भारताला मान्य नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)