पाकिस्तानने केली 5 चिनी इंजिनीयर्सची हकालपट्टी

लाहोर (पाकिस्तान) -पाकिस्तानने पाच चिनी इंजिनीयर्सची पाकिस्तानमधून हकालपट्टी केल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाने दिली आहे. या पाचही इंजिनीयर्सना चीनमध्ये परत पाठवण्यात आलेले आहे. पाकिस्तानात चिनी नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीचा भंग केल्याचे कारण देण्यात आले आहे. सीपीईसी प्रोजेक्‍टवर काम करण्याऱ्या या पाच इंजिनीयर्सना पोलीसांनी पुरेशा सुरक्षेविना रेड लाईट एरियात जाण्यास मनाई केली होती.

खानेवाल विभागात हे घटना घडली आहे. सुरक्षेविना रेडलाईट एरियामध्ये जाण्यास पोलीसांनी या पाच चिनी इंजिनीयर्सना मनाई केली असता त्यांनी पोलीसांनाच मारहाण केली. परिणामी त्यांची पाकिस्तानमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यांची चीनला रवानगी करण्यात आली. ही पाचही इंजिनीयर्स पाकिस्तान आणि चीन यांच्या सीपीईसी या संयुक्त प्रकल्पातील एका चिनी कंपनीत काम करत होते. प्रोजेक्‍ट मॅनेजर शू लिबिंग, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तियान वेजुन, इंजिनीयर लियू हुई, फायनान्शियल मॅनेजर वॉंग इफान आणि फील्ड इंजिनीयर तान यांग अशी त्यांची नावे देण्यात आलेली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)