‘पाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे’

लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांचा टोला

पुणे – “भारताने आतापर्यंत अनेकदा पाकिस्तानला मैत्रीचा हात दिला आहे. त्यामुळे आता आधी त्यांनी एक पाऊल पुढे यावे. भारतासोबत आपले मैत्रीपूर्ण संबंध असावे, असे पाकिस्तानला जर वाटत असेल तर त्याने आधी स्वत:ला “इस्लामिक’ राष्ट्र न म्हणवता, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करावी, असा टोला भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी लगावला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त पुण्यात आलेल्या रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्तारपूर कॉरिडॉरच्या गुरूवारी झालेल्या उदघाटनप्रसंगी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी “भारत आणि पाकिस्तानमध्ये मजबूत संबंध प्रस्थापित व्हावे अशी आमची इच्छा आहे. भारताने एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पाऊल पुढे टाकू असे सांगितले होते. याविषये विचारले असता, रावत म्हणाले,”भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तर पाकिस्तान स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणवतो. ते एकीकडे मैत्रीपूर्ण संबंधांची भाषा करतात आनि दुसरीकडे दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देतात. असे असेल तर कोणत्या आधारावर त्यांच्यासोबत मैत्री करायची? त्यांनी आधी स्वत:च्या देशामधील दहशतवादी तळांना नष्ट करत एक पाऊल पुढे टाकावे, त्यानंतरच भारत आपले पाऊल पुढे टाकेन. अन्यथा “दहशतवाद आणि चर्चा’ एकत्र होऊच शकत नाही या धोरणावर आम्ही कायम आहोत.

सैन्यदलात सध्या महिलांना कायस्वरूपी पद देता येईल का, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानुसार, मानसशास्त्र, भाषा अनुवादक, लेखापाल, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांचा विचार होत आहे. लवकरच याबाबत महत्वाचे निर्णय होतील. मात्र प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांना नियुक्त करणे तुर्तास शक्‍य नाही. सैन्य दलातील बरेचसे जवान हे गावांमधून आलेले असतात. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांप्रमाणे महिलांसोबत काम करण्याची मानसिकता अजून त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांची नियुक्ती नाही, असेही रावत यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)