पाकिस्तानत इम्रान खानला रोखण्यासाठी विरोधी पक्षांची एकी

इस्लामबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचा भावी पंतप्रधान, माजी क्रिकेटपटू इम्रान खानला रोखण्यासाठी पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी हातमिळवणी केली आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, या उक्तीची प्रचिती देत पीएमएल -एन (पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज) आणि पीपीपी (पाकिस्तान पीपल्स पार्टी) या दोन पक्षांनी इम्रान खानच्या विरोधात हात मिळवणी केली आहे.

पीएमल-एन आणि पीपीपी हे दोन पक्ष एकमेकांचे कट्टर हाडवैरी म्हणतात, तसे विरोधक. पण इम्रान खानला रोखण्यासाठी ते एकत्र आले आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असे त्यांचे साधे तत्त्वज्ञान आहे. पीएमएल-एन या पूर्वीच्या सत्ताधारी पक्षाला 64 तर पीपीपीला 43 जागा मिळाल्या आहेत. इम्रान खानच्या पीटीआय पक्षाला सर्वधिक 116 जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमतापासून पीटीआय दूरच आहे. छोट्यामोठ्या पक्षांच्या सहकार्याने पीटीआयला सरकार स्थापन करावे लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवडणुकीत झालेल्या गडबड घोटाळ्यांचा आणि निवडणुकीत रिगिंग झाल्याच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. ही निवडणुक निष्पक्ष झाली नाही. निवडणूक लढवण्यसाठी सर्व पक्षांना समान संधी देण्यात आली नाही. असे पीएमएल-एन च्या प्रवक्‍त्या मरियम औरंगजेब यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)